तिची शाळा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

वैतागलेल्या चेहऱ्यानं
तो नुसता उभा राहिला.
तिनं त्याचं डोकं पुसलं
गळ्या-खांद्यावरून एकदा
हलका हलका टावेल फिरवला.
पायावरची सारी ओल
टिपून त्याला केला कोरडा
घड्याळाच्या टिकटिकीवर
तिचा सुरू आरडाओरडा...

कुरळ्या केसांमधून त्याच्या
काढला तिनं नीटस भांग
गळ्याभवती, पाठीवरती
घामोळ्यांची दिसली रांग
पावडर थापून त्याच्यावरती
तिनं उघडलं झटकन कपाट
युनिफॉर्मची चड्डी-शर्ट
इस्त्रीवाला नवीन थाट

भराभरा भरले डबे
एक छोटा, एक मोठा
छोट्या डब्यात चटकमटक
मोठ्यामध्ये भाजी-प्राठा

वैतागलेल्या चेहऱ्यानं
तो नुसता उभा राहिला.
तिनं त्याचं डोकं पुसलं
गळ्या-खांद्यावरून एकदा
हलका हलका टावेल फिरवला.
पायावरची सारी ओल
टिपून त्याला केला कोरडा
घड्याळाच्या टिकटिकीवर
तिचा सुरू आरडाओरडा...

कुरळ्या केसांमधून त्याच्या
काढला तिनं नीटस भांग
गळ्याभवती, पाठीवरती
घामोळ्यांची दिसली रांग
पावडर थापून त्याच्यावरती
तिनं उघडलं झटकन कपाट
युनिफॉर्मची चड्डी-शर्ट
इस्त्रीवाला नवीन थाट

भराभरा भरले डबे
एक छोटा, एक मोठा
छोट्या डब्यात चटकमटक
मोठ्यामध्ये भाजी-प्राठा

पाण्याची बाटली, कंपासपेटी
पुस्तकांचा गठ्ठा, वह्यांची रास
कपाळावर हात मारून 
म्हणते : ‘‘होणार कधी अभ्यास?’’

गध्द्याचा होमवर्क बाकी आहे,
वह्या सगळ्या इनकम्प्लीट
खेळ, कंम्प्युटर, सेलफोनदेखील
आणतो तिला कायम झीट
...‘पाय उचल’ असं ओरडत
तिनं घातले त्याला मोजे
पॉलिशवाले बूट त्यावर
...पाठीवरती केवढे ओझे

चिमुकलीशी चिमुकपापी
चिमुक गोबरे त्याचे गाल
चिमुकल्याच्या शाळेपायी
तिची अशी उलाघाल

टाटासुद्धा न म्हणता 
पोरगं पळालं जोराजोरात
‘चला चला’ म्हणत तेव्हा
स्कूलबस उभी दारात

धावत जाऊन तिनं तेव्हा
खिडकीमधलं पोर गाठलं
‘शू लागली तर टीचरला पण
सांगून जा हं’ असं सांगितलं.

हल्ली रोज असंच होतं
दिवस सगळा चोळामोळा
पोरगं सुखरुप येईतोवर
जीव सगळा होतो गोळा

जीव सगळा होतो गोळा...

Web Title: dhing tang article