ढिंग टांग : बाई या पावसानं..!

ढिंग टांग व्यंगातून पावसाळी मुंबईतलं ‘रामरक्षा आंदोलन’; दादरच्या हनुमान मंदिरापर्यंतच्या राजकीय नाट्यप्रवासाची खुमासदार गोष्ट
The latest Dhing Tang column blends Mumbai rain with political commentary in a light-hearted and entertaining style.

The latest Dhing Tang column blends Mumbai rain with political commentary in a light-hearted and entertaining style.

Sakal

Updated on

स्थळ : मातोश्री हाइट्स, बांद्रा सोसायटी. वेळ : एक अस्वस्थ सकाळ!

चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक करत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (दार न उघडता कंटाळून) नको! मी विचार करतोय...डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड दारावर लटकावलाय! वाचा की तो जरा!!

विक्रमादित्य : (दार ढकलून बिनदिक्कत आत येत) कमॉन, बॅब्स...ही विचार करण्याची वेळ नाही, कृती करण्याची आहे! वी नीड ॲक्शन!!

उधोजीसाहेब : (खिडकीबाहेर पाहात) किती पाऊस पडतोय रे! अशा पावसात कुणी कृतीबिती करतं का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com