

Strategic Machinations: Analyzing the Ruse and Compartmentalized Plotting of Chess Layouts
Sakal
भुजांमध्ये कितीही बळ असले तरी बुद्धिबळात ते कामाचे नाही. जिम जॉइन करून कोणी ग्राण्डमास्टर झाल्याचे तुम्ही ऐकले आहे काय? बुद्धिबळात मनुष्य धूर्त, कपटी आणि कारस्थानी लागतो. अचूक व्यूह रचून प्रतिस्पर्ध्याची प्यादी, हत्ती, घोडे, उंटादी फौज मारून राजाला शहामात द्यावी लागते. शहाला मात देणे ही काही जोक नव्हे! एक म्हणता दुसरेच व्हायचे. येवढी जोखीम (हल्ली) कोण पत्करते. शहामात (ऊर्फ चेकमेट) करण्याची पाळीच येवो नये म्हणून काही खऱ्याखुऱ्या बुद्धिबळपटूंनी क्यारमकडे मोहरा वळवल्याचे क्रीडाक्षेत्रातील सूत्रांकडून समजते. खरेखोटे देव जाणे.