

Dhing Tang: "He Was Just Here, Where Did He Go..?" – A Satirical Take on Brain Theft by British Nandi
Sakal
आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल की मानवी शरीरात मेंदू नावाचा एक अवयव असतो. हा मेंदू साऱ्या शरीरातील निरनिराळ्या अवयवांचे, तसेच इंद्रियांचे नियंत्रण करतो. तसे पाहू गेल्यास अनेक सजीवांना छोट्यामोठ्या आकाराचा होईना, पण मेंदू असतोच. उदाहरणार्थ, वाघालाही मेंदू असतो. माकडालाही असतो. परंतु, मनुष्यप्राण्याला (जरुरीपेक्षा) मोठ्या आकाराचा मेंदू असतो. इतकेच नव्हे तर मानवाला एक सोडून दोन-दोन मेंदू असतात. लहान मेंदू आणि मोठा मेंदू! काही लोकांचा मोठा मेंदू लहान असतो, आणि लहान मेंदू मोठा असतो. त्यामुळे कुठला मेंदू कुठले कार्य करतो हे कळणे अवघड होऊन बसते.