ढिंग टांग : जंगी खडाजंगी..!

मातोश्री महालात उधोजीराजे संतापाने पेटले; कदीम सेवक संजयाजींवर युवराजांशी खडाजंगीचा आरोप, पण ते दिल्लीत पुस्तकप्रकाशनाला असल्याचा गौप्यस्फोट
Palace Intrigue: Udhoji Maharaj Questions Sanjayaji Farzand's Loyalty

Palace Intrigue: Udhoji Maharaj Questions Sanjayaji Farzand's Loyalty

Sakal

Updated on

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान, बुद्रुक. वेळ : प्रात:काली सुमारे बारा वगैरे…बाराच!

राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंत:पुरात येरझारा घालत आहेत. दातोठ खावोन अधोन मधोन अल्प अपशब्दासदृश भावनांना वाट करोन देत आहेत. ‘ही मजाल?’, ’ही हिंमत?’, ‘हात कलम करीन, मुंडके उडवीन, जिभा छाटीन’ वगैरे विच्छेदनाची भाषा त्यांच्या ओठी आहे. अब आगे…

उधोजीराजे : (गर्रकन वळोन पाहात) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी फर्जंद : (थंडपणाने येऊन मुजरा घालत) येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय हायेच कोण?

उधोजीराजे : (हाताने थांबवत) पुरे पुरे!! फर्जंद तुम्ही आमचे कदीम सेवक ना?

संजयाजी फर्जंद : (पुन्हा मुजरा घालत) हे काय विचारणं झालं?

उधोजीराजे : (दीर्घ श्वास घेऊन गांभीर्यानं) तुमच्या निष्ठा आमच्या चरणी वाहिल्या आहेत ना?

संजयाजी फर्जंद : (पुन्हा एकवार मुजरा…) अग्निपरीक्षा घेऊन बघा, महाराज!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com