ढिंग टांग : या रावजी, तुम्ही जेवा सावजी..!

सावजी भोजनावर तुकारामबावांची टीका, खवय्ये संतप्त; नागपुरी झटक्याच्या चवीवर ‘इस्पितळ’ वाद
British Nandi’s satirical ‘Dhing Tang’ humorously comments on Savji cuisine and recent food safety actions involving FDA Commissioner Tukaram Mundhe.

British Nandi’s satirical ‘Dhing Tang’ humorously comments on Savji cuisine and recent food safety actions involving FDA Commissioner Tukaram Mundhe.

Sakal

Updated on

श्रावण मास लागण्याच्या आतच सदरील ज्ञान देणे आम्हास आवश्यक वाटते. अस्सल नागपुरी झटका असलेले सावजीचे भोजन जेवल्यास महिन्याभरात इस्पितळात जाण्याची वेळ येईल, ऐसे भय आमचे दुष्टांचे कर्दनकाळ आणि सुष्टांचे मित्र जे की तुकारामबावा मुंढेसाहेबांनी व्यक्त केले. हे ऐकून आम्ही हिरमुसलो आहो! आम्ही या पृथ्वीतलावर आजवेरी कैक दशके काढिली. सावजी भोजनाचा आस्वाद हरघडी घेत घेतच आम्ही श्वासोच्छ्वास केला. आजवर तरी आमच्यावर इस्पितळात जाण्याची वेळ आली नाही. उप्परवाला खैर करे!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com