ढिंग टांग : डीजे : शाप की वरदान..!

पुण्यात डीजेच्या कर्णकर्कश आवाजावरून परंपरावादी व आधुनिकतावादी आमनेसामने; ध्वनिप्रदूषण, संस्कृती आणि तरुणाईच्या ‘थिरकण्याच्या हक्का’वरून तापलेली चर्चा
Dhing Tang: DJ — Curse or Boon?

Dhing Tang: DJ — Curse or Boon?

Sakal

Updated on

मित्रहो, अतिशय गहन अशा ‘डीजेचा (गैर) वापर’ या विषयावर अतिशय मोठ्या आवाजात बोलावयाची वेळ आता आली आहे. ‘डीजे’ ही एक सध्याच्या काळातली खूपच मोठी समस्या आहे. पुण्यात तर ही समस्या आंतरराष्ट्रीयच होऊन बसली आहे. आधीच पुण्यात दुसऱ्याचे ऐकणारे कमी! त्यात ‘डीजे’च्या प्रसारामुळे बहिरेपण आल्याने कर्णयंत्रांची विक्रीही (पुण्यात) मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. हे आम्ही कानीकपाळी ओरडून सांगत आहो, पण ऐकतो कोण?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com