

A satirical political illustration depicting a humorous conversation about student protests, political accountability and waiting for resignations, in the style of a Marathi newspaper column.
Sakal
बेटा : (धुमधडाक्यात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक..! धुडुम धडाड ढिचक्यांव...ठठठठठठ..!! ढिशुम खटॅक!
मम्मामॅडम : (खुर्चीतून उठत चाचरत) हे काय होतं?
बेटा : (खुशीत)...जरा फटाके फोडले!! मी फटाके फोडले की मोदीजी आणि शहाजी बिळात लपून बसतात!! हाहा!! हे सगळे कमळवाले जाम घाबरट आहेत!! भाग गये, टाटा, बाय बाय, खल्लास!!
मम्मामॅडम : (पुन्हा खुर्चीत बसत गंभीरपणाने) कोण कोणाला घाबरतंय, हे महत्त्वाचं नाही! माझ्या विद्यार्थ्यांना जे भोगावं लागतंय, त्याची मला काळजी आहे...
बेटा : (दिलासा देत) त्या विद्यार्थ्यांना म्हणावं, जस्ट डोण्ट वरी! मैं हूं ना!! मला मोदीजी आणि शहाजी किती घाबरतात, हे संपूर्ण देशानं पाहिलंय आता!! माझ्या डोळ्याला डोळा भिडवून बोलायची हिंमत नाही त्यांची!! देखो भय्या, इस देश के स्टुडेंट अब इन दोनों को बिलकूल नहीं डरते!!