ढिंग टांग : खरातो एकचि धर्म..!

अंधश्रद्धा, बुवाबाजी, हवाला, जादूटोणा, खोक्यांची राजकारणातली चलती आणि संतवचनांना खड्ड्यात टाकणारा विकासाचा खोटा मुखवटा उघड करणारी व्यंग्यात्मक मांडणी
Politics of Blind Faith: The Unholy Alliance Between Corrupt Leaders and Fake Godmen

Politics of Blind Faith: The Unholy Alliance Between Corrupt Leaders and Fake Godmen

Sakal

Updated on

व्यर्थ ज्ञानेश्वर । व्यर्थ झाला तुका ।

एका झाला मुका । वाचा गेली ॥

व्यर्थ गाडगेबाबा । व्यर्थ तुकडोजी ।

फुकाचे गुरुजी । ठरले आता ॥

शिकविले यांणी । तुम्हा आम्हां सारे ।

विचारांचे वारे । घुमविले ॥

आंधळ्या श्रध्देचे । झाले निर्मूलन ।

विज्ञान विज्ञान । गजर हो झाला ॥

ज्ञानाचे पवन । वाहिले वाहिले ।

इकडुनि आले । तिकडे गेले ॥

पुरोगामी झाला । अमुचा महाराष्ट्र ।

आणि धष्टपुष्ट । विकासाने ॥

सारे काही आता । उलटे पालटे ।

संताची सालटे । निघती देखा ॥

खड्ड्यामाजी गेली । संतांची वचने ।

नेत्यांची भाषणे । मतांलागी ॥

तोचि गा पारधी । ज्याच्या हाती ससा ।

करा खाली खिसा । बाकीच्यांनी ॥

दुनिया कसली । वेड्यांचा बाजार ।

जिथे होते ठार । विवेकबुध्दी ॥

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com