

Dhing Tang is one of the most popular Marathi satirical columns, known for its witty take on politics and society.
Sakal
स्थळ : कुठल्याही गावातला उकिरडा.
वेळ : एक मनोहर सकाळ!
नुकताच पाऊस पडून गेला होता. उकिरड्याच्या ढिगाऱ्याशी दोन महान प्राणी आनंदसेवन करीत होते. ज्याप्रमाणे मानवप्राणी सकाळी उठून मिसळपाव, इडली सांबारादी पदार्थांवर ताव मारतात, तशीच गर्दभ प्रजात चांगलासा उकिरडा बघून गप्पाष्टक रंगवते.