उद्योगाभिमुख बदलाची इंजिनिअरिंगला गरज...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

इंजिअनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुध्दिमत्ता तसेच मशिनल लर्निंग, ॲटोमेशन शिकायला हवे. त्याचप्रमाणे, त्यांनी दैनंदिन जीवनातही तार्किक विचारक्षमता लागू करायला हवी. विद्यार्थ्यांची विचारपध्दत व समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे एफआयआयटीजेईईनी लोकप्रियता मिळवली.
- डी. के. गोयल, संचालक व मुख्य सल्लागार, एफआयआयटीजेईई

भारतात इंजिनिअरिंगचे शिक्षण व्यावहारिक व कौशल्याधारित करायला हवे. त्यासाठी, अध्यापनशास्त्रात आमूलाग्र बदल करण्याबरोबरच विविध घटकांमधील दरीही दूर करावी लागेल. ‘एफआयआयटीजेईई’ने इंजिनिअरिंगमधील प्रतिष्ठित ‘जेईई’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आदर्श प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. ‘एफआयआयटीजेईई’चे संचालक आणि मुख्य सल्लागार डी. के. गोयल यांच्याशी साधलेला संवाद.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतातील सध्याच्या इंजिनिअरिंग शिक्षणाची सद्यःस्थिती सविस्तरपणे कशी सांगाल?
भारतात इंजिनिअरिंगचे शिक्षण विकसित होत आहे. त्यात मेकॅट्रोनिक्स इंजिनिअरिंग, नॅनो-इंजिनिअरिंग, स्पेस इंजिनिअरिंग, ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आदी नावीन्यपूर्ण व आकर्षक शाखांचा उदय होतो आहे. तरीही, भारतातील इंजिनिअरिंग शिक्षणामध्ये धोरणात्मक बदलाची गरज आहे. देशातील इंजिनिअर्सची संख्या मोठी असून, बहुसंख्य खासगी महाविद्यालयांमधील इंजिनिअर बेरोजगार राहतात. भारतासह परदेशातील उद्योगांमधील वेगाने बदलणाऱ्या तांत्रिक आणि व्यावसायिक गरजाही वेगाने बदलत आहेत. उद्योगांच्या शाश्वत विकास, ॲटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग आदी गरजांच्या दृष्टिने इंजिनिअरिंगचे विषय कालबाह्य झालेत किंवा अपडेट केलेले नाहीत. मुळात विद्यार्थ्यांच्या आकांक्षा- पालकांचा दबाव, अभ्यासक्रम - उद्योगांच्या गरजा, सत्तेतील राजकीय पक्ष - व्यवस्थापन यांच्यात दरी निर्माण झालीय. मात्र, आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी, बीआयटीएस बदलत्या वेगवान तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आहेत. 
 
दरवर्षी हजारो विद्यार्थी इंजिनिअरिंगची पदवी घेतात. मात्र, त्यापैकी अनेकजण बेरोजगार राहतात. यावर तुम्ही काय उपाय सुचवाल?
मोठ्या बेरोजगारीमागचे मोठे कारण म्हणजे खासगी कॉलेजमध्ये निवडीसाठी कोणतेही निकष नाहीत. संस्था कोणत्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन देतात. त्याचप्रमाणे तिथे अद्ययावत अभ्यासक्रम किंवा नोकरीसाठीची आवश्यक कौशल्येही शिकविली जात नाहीत. परिणामी, या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे खूप अवघड होते. त्यावरचा उपाय म्हणजे, इंजिनिअरिंगचे शिक्षण उद्योगाभिमुख दृष्टिकोनातून व्यावहारिक आणि कौशल्याधारित हवे. त्यातून आपण देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकतो. इंजिनिअरिंग पदवीधरांची मोठी बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी अध्यापनशास्त्राचा चेहरामोहरा बदलायलाच हवा. तरीही मर्यादित साधनांच्या जोरावर भारतीय विद्यार्थी इतरांच्या तुलनेत पुढे आहेत. ते आपल्या असामान्य कर्तृत्वातून जगाला लक्ष द्यायला भाग पाडतील. 

इंजिनिअरिंगचे शिक्षण आणि उद्योगांच्या गरजांमधील वाढती दरी कशी कमी करावी?
ही दरी वाढण्यामागचे कारण, आज बहुतेक कॉलेजमधून शिकविले जाणारे विषय कालबाह्य झाले आहेत. ते बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत नाहीत. ही दरी भरून काढण्यासाठी इंजिनिअरिंगचे विषय आणि विद्यार्थ्यांनी उद्योगांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मशिन लर्निंग कौशल्ये, ॲटोमेशन आणि शाश्वत विकासाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात. कॉलेज सिलॅबस आणि उद्योगांच्या गरजा, पालकांचा दबाव आणि विद्यार्थ्यांच्या आशाआकांक्षांमधील सहसंबंध पुन्हा जोडला गेला की, उद्योगांनाही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे विद्यार्थी मिळू लागतील. 

रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण शिक्षणव्यवस्था कशी बदलू शकतो?
सर्वप्रथम आपण ‘घोका आणि ओका’ पद्धतीच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेला सर्वाधिक कोणत्या मूलभूत बदलाची गरज असेल, तर तो म्हणजे संकल्पनाधारित अध्ययनाची. त्यामुळे विद्यार्थी केवळ शिकविलेल्या घटकाची घोकंपट्टी करणार नाहीत, तर तो घटक मुळातून समजून घेऊन लागू करायला शिकतील. याशिवाय, उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन कौशल्याभिमुख एकीकृत शिक्षणव्यवस्थेला चालना द्यायला हवी. रोजगारवृद्धीचा हाच एकमेव मार्ग आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यामधील उपजत गुणवत्ता ओळखणे आणि संबधित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला त्यानुसार सर्वोत्तम क्षमतेनुसार कामगिरी करण्यासाठी तयार करणे, ही खासगी कॉलेजेसची जबाबदारी आहे. केवळ याच मार्गाने विद्यार्थी अधिक चांगली कामगिरी करू शकतील. आपल्या बुद्धिमत्तेला उत्पादकतेत उतरवू शकतील.    

‘एफआयआयटीजेईई’ बद्दल काय सांगाल, स्थापना कधी झाली?
इन्स्टिटयूटची मूळ कल्पना १९९१मध्ये मनात आली. प्रत्यक्षात जून १९९२मध्ये दिल्लीत केवळ दहा हजार रुपयांच्या भांडवलावर ८०० चौरस फूटांच्या छोट्या खोलीत एफआयआयटीजेईई सुरू झाली. ‘आयआयटी - जेईई’साठीचा एक फोरम म्हणून आम्ही विनम्रतेने सुरवात केली. या परीक्षेची गांभीर्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श लाँच पॅड पुरविण्याची दूरदृष्टी त्यामागे होती. योग्य मार्गदर्शनाअभावी आयआयटीयन्स बनण्याचे अनेकांचे स्वप्न अधुरे राहते. त्यांना संधीचा व्यवस्थित फायदा घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या तीव्र इच्छेतून आयआयटी- ईईच्या तयारीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. आम्ही कोचिंगच्याही पलीकडे गेलो. विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत आणि समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलण्यास सुरवात केली. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांचा बुध्यांक (IQ) विकसित करण्यावरही आम्ही काम सुरू केले. एफआयआयटीजेईईमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर आम्ही अमीट ठसा उमटवला. कित्येक वर्षांपासून आमचे विद्यार्थी ‘आयआयटी - जेईई’मध्ये ‘टॉप रॅंक’ मिळवत आहेत, याचा हा पुरावाच. आम्ही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणत असतानाच सातत्याने उत्कृष्टतेची नवनवीन शिखरे गाठत होतो. यातूनच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसह आज हा टप्पा गाठला आहे. खरंतर, अशक्यप्राय गोष्टीचे ध्येय समोर ठेवून सातत्याने आपली कामगिरी उंचावत राहणे, हे एफआयआयटीजेईईच्या डीएनएमध्येच आहे. आज ईश्वरीकृपा आणि आमचे प्रयत्न, दृष्टीमुळे एफआयआयटीजेईईने केवळ संपूर्ण भारतात नव्हे, तर तीन देशांमध्येही आपले अस्तित्व निर्माण केले आहे. भारतातील ४५ शहरांमध्ये ८० केंद्रे, ५ वर्ल्ड स्कूल्स, ११ ज्युनियर कॉलेजेस आणि ७८ असोसिएट स्कूल्समध्ये ‘एफआयआयटीजेईई’चा झेंडा डौलाने फडकतोय. वरील सर्व शाखांमध्ये उच्च दर्जाचा, अनुभवी शिक्षकवर्ग आहे. इन्स्टिट्यूटचा असा वटवृक्ष होताना व भारत, परदेशातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ होतानाचे साक्षीदार होणे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.  

देशातील इतर इन्स्टिट्यूटपेक्षा तुमच्या इन्स्टिट्यूटचे वेगळेपण कसे स्पष्ट कराल?
हे तर निर्माता विरुद्ध अनुयायी आहे. आम्ही निर्मिती करतो, इतर अनुकरण करतात. आमची अंतर्गत व भक्कम मूल्यव्यवस्था आम्हाला इतरांपेक्षा वेगळे करते, ती सत्य, पारदर्शकता आणि बांधिलकीभोवती फिरते. आम्ही ज्याचा आधी विचार करतो, तेच बोलतो आणि करतो. आम्ही पालक, विद्यार्थ्यांसमोर जसे आहोत, तसेच सादर होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्येही तीच मूल्ये रूजविण्याचा गांभीर्याने प्रयत्न करतो. आज येनकेन प्रकारे निष्पाप विद्यार्थी व पालकांना फसविणाऱ्या अनेक इन्स्टिटयूट आहेत. 

एफआयआयटीजेईई कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, सत्य आणि बांधिलकीवर विश्वास ठेवते. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये नोंदणी करण्यापूर्वी विद्यार्थ्याला ॲडमिशन टेस्टसाठी पात्र व्हावे लागते. त्यातून जेईई (मेन आणि ॲडव्हान्सड) सारख्या प्रतिष्ठित परीक्षांच्या दृष्टिने विद्यार्थ्याची क्षमता आणि आयक्यू तपासला जातो. मात्र, इतर इन्स्टिट्यूटमध्ये थेट प्रवेश दिला जातो किंवा नाममात्र ॲडमिशन टेस्ट घेऊन धूळफेक केली जाते. घोकंपट्टीच्या पलीकडे जात संकल्पना आधारित अध्ययन हाही आम्हाला इतर इन्स्टिट्यूटपेक्षा वेगळे करणारा महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्याचा पाया पक्का झाल्यावर तो किंवा ती कोणत्याही परीक्षेसाठी तयार होऊ शकते, हे आमचे वैशिष्टय. आमची अध्यापनाची पद्धत त्यावरच केंद्रित झालेली आहे. दरवर्षीच्या स्पर्धात्मक किंवा शिष्यवृत्ती परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे निकालातून आमचा हा वारसा ठळकपणे दिसतो. उत्कृष्ट आणि सखोल संशोधनातून तयार केलेले अभ्यास साहित्यही आम्हाला आमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे ठेवते. या सर्वांमुळेच आयआयटी -जेईईमध्ये एफआयआयटीजेईई देशभरात सर्वाधिक नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी दर्जेदार स्टडी मटेरियलला पर्याय नसतो, याचीही आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच आमची टीम दिवसाचे २४ तास उत्कृष्ट, दर्जेदार स्टडी मटेरियल निर्माण करण्यात गुंतलेली असते. हे मटेरियल विद्यार्थ्यांसाठी अमृतासमानच आहे. ते इतके दर्जेदार आहे की इतर प्रकाशक किंवा इन्स्टिट्यूटही त्याची शिफारस करतात. सारांश, आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा केवळ वेगळे नाही, तर कितीतरी पुढे आहोत.     

इंजिनिअरिंगला यशस्वीरित्या प्रवेश कसा मिळवावा? त्यासाठी विद्यार्थ्याने नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत? 
विद्यार्थ्यांनी मूलभूत संकल्पनांच्या अभ्यासापासून सुरवात करायला हवी. त्याचप्रमाणे, तार्किक विचारक्षमता व विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करणे, मुलभूत तत्वांपासून प्रॉब्लेम सोडविणे आणि त्यातून आव्हानात्मक प्रश्न सोडवायला हवेत. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील प्रश्नांना ही संकल्पना लागू करायला शिकले पाहिजे. त्याचप्रमाणे, प्रश्न वेगवेगळ्या पद्धतींनी सोडवता येण्यासाठी समांतर विचार प्रक्रियाही विकसित करायला हवी. विद्यार्थ्यांनी आपल्या दिनक्रमातही आवश्यक तो बदल करायलाच हवा. त्यांनी सावधपूर्वक अध्ययन, सराव, चाचणी, विश्लेषक, कमकुवत घटकांवर काम करणे हे चक्र पाळायला हवे. परीक्षेसारख्या वातावरणात सराव करावा. प्रश्न सोडविण्याचा वेग आणि अचूकता वाढवणेही तयारीच्या दृष्टिने महत्त्वाचे. एफआयआयटीजेईईला कायमस्वरूपी जगातील सर्वोत्तम शिक्षणसंस्था म्हणून पाहायचे आहे.

एफआयआयटीजेईई च्या विद्यार्थ्यांच्या आयआयटीजेईईमधील कामगिरीबद्दल समाधानी आहात का? तुमचे भविष्यातील उपक्रम कोणते?
मला हे सांगताना निश्चित आनंद वाटतो, की आमच्या विद्यार्थ्यांची आत्तापर्यंतची कामगिरी आनंददायक आहे.  हा प्रवास आनंददायी असून आम्ही एकत्रितरित्या अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. तरीही आम्ही निवांतपणे बसू शकत नाही. मात्र, तरीही आम्हाला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. ईश्वरानेही आमच्यावर कृपाशिर्वाद ठेवला, हे विनम्रतेने सांगू इच्छितो. आमच्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाची जोड मिळाली. त्यामुळे, एफआयआयटीजेईईचे सर्वाधिक विद्यार्थी आयआयटी - जेईई (जेईई ॲडव्हान्सड) मध्ये मोठ्या संख्येने निवडले जातात. गेल्या २३ वर्षांतील वर्गातील व २२ वर्षांतील सर्व प्रकारच्या अध्ययन उपक्रमातून ही देदिप्यमान कामगिरी दिसते. आम्ही विद्यार्थी - पालकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. आजही हा प्रवास संपलेला नाही, कारण आमच्यासाठी सतत प्रवास करत राहणे, हेच अंतिम उद्दिष्ट आहे. आज मोठ्या संख्येने एफआयआयटीजेईईचे विद्यार्थी आपले जेईईचे ध्येयं पूर्ण करत असल्याचे पाहून खूप समाधान वाटते. केवळ जेईईचं नव्हे तर जीवनात ते सर्वांगीण यश मिळवतात. मात्र, आणखी करण्यासारखेही खूप काही आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून बदल घडवणे, त्यातून भारतात आदर्श समाजनिर्मितीला चालना देणे, ही माझी दृष्टी आहे.

सध्या कोव्हिड -१९ साथीचा तुम्ही कसा सामना करत आहात? तुम्ही काही बदल केले आहेत का?
सध्याच्या कोरोना संसर्गात इतर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयारी मध्येच सोडली आहे. मात्र, एफआयआयटीजेईईचे विद्यार्थी आजिबात तणावात नाहीत. आम्ही परिस्थिती ओळखून ताबडतोब लाईव्ह ऑनलाईन क्लास सुरू केले. ती प्रत्यक्षातील क्लासचीच प्रतिकृती आहे. ते तितकेच परिणामकारक आहेत. आम्ही आमच्या शिक्षणाच्या माध्यमातही बदल केलाय. ऑफलाईन क्लासप्रमाणेच बॅचनुसार लाईव्ह ऑनलाईन क्लास सुरू केले आहेत, ज्यात विद्यार्थ्यांनाही नेहमीप्रमाणे संवाद साधता येतो. एफआयआयटीजेईईचे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक मार्गदर्शन ऑनलाइन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचेही ते सर्वतोपरी प्रयत्न करून शेवटपर्यंत शंकानिरसन करतात. त्यामुळे, आम्ही सध्याच्या परिस्थितीचा सर्वांत आदर्श पध्दतीने सामना करतोय, याचा अभिमान वाटतो. आमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ध्येयांवर याचा कसलाही परिणाम झालेला नाही. परिस्थिती सामान्य होताच आमचे ऑफलाइन क्लासही सुरू होतील. यापुढेही भौगोलिक किंवा इतर कारणांमुळे ऑफलाइन क्लास करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासचा पर्याय असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discussion with DK Goyal on Engineering needs industry oriented change