
डॉ. कांचनगंगा गंधे (पुणे)
अशोककुमार सिंग (लखनौ)
बकुळ, पारिजात आणि सोनचाफा म्हणजे दैवी फुलांचे ‘त्रिमूर्ती.’ ही तीनही फुलं म्हणजे हिंदू लोकसंस्कृती, जीवनशैली आणि ऋषीमुनींसारख्या पूर्वसूरींशी खोलवर जोडलेलं नातं! एप्रिल-मे महिन्याच्या दाहकतेमध्ये बकुळीच्या फुलांना बहर येतो, तेव्हा सुगंधाची परमावधी गाठलेली ही फुलं वाळल्यानंतरही श्रावण-भाद्रपदापर्यंत सुवासिक राहतात. सुगंधी फुलांपैकी बकुळीचं एकमेव फूल असं आहे, की त्याचा वास फूल वाळल्यानंतरही टिकून राहतो, म्हणूनच की काय वाळलेली बकुळीची फुलंसुद्धा देवपूजेत वापरतात. हा मान एकट्या बकुळ फुलालाच मिळालेला आहे.