SantDnyaneshwar
Sakal
संपादकीय
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी।
भक्ती, ज्ञान आणि मराठी अभिमान यांचा संगम असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या परिष्करण दिनानिमित्त माउलींना मानाचा मुजरा!
डॉ. यशोधन किसनमहाराज साखरे
ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा अभिव्यक्ती काळ श्री ज्ञानराज माउलींनी भावार्थ दीपिकेच्या शेवटी उद्धृत केला आहे. माउली सांगतात, शके बाराशे बारोत्तरे। तैं टीका केली ज्ञानेश्वरे। सच्चिदानंद बाबा आदरे। लेखकू जाहला। परंतु त्या ठिकाणी ग्रंथ परिपूर्तीची तिथी मात्र माउलींनी उद्धृत केलेली नाही. कालौघात माउलींच्या नंतर अवतरीत झालेल्या शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे संपादन केले. त्या ठिकाणी श्री एकनाथ महाराजांनी संपादन परिपूर्तीच्या तिथीचा उल्लेख स्पष्टपणे केला आहे. श्री नाथ महाराज म्हणतात, श्रीशके पंधराशें साहोत्तरीं