
S. L. Bhyrappa
sakal
- डॉ. अरुणा ढेरे
ज्येष्ठ कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांमधील व्यक्तिरेखा, रेखाटलेले आयुष्य, कुटुंबजीवन, मांडलेले विषय हे सर्व भारतीय आहे. भारतीय संस्कृती आणि मूल्यधारणा या सर्वांचा वेध त्यांनी कादंबऱ्यांमधून घेतलेला दिसतो. प्रत्येक कादंबरीतून दरवेळी स्वत:चा एक वेगळा शोध घेत गेले; त्याचबरोबरच संस्कृतीचे वेगळे अंग उजेडात आणत गेले.