'सांख्य’दर्शन: मालमत्तेतील घटीचा कूट प्रश्न

'सांख्य’दर्शन: मालमत्तेतील घटीचा कूट प्रश्न

‘आशिक का हर आसू एक कहानी है, थम गया तो ताज, बह गया तो पानी है!’ धारा आणि संचय या बाबींबद्दल कोण्या एका शायराने केलेले हे वर्णन! नेमक्या याच दोन बाबींवर अर्थतज्ज्ञदेखील भाष्य करतात; पण ते फारच अरसिक असते! संचयाला ‘मालमत्ता’ म्हटले जाते, तर धारा तत्त्वावर अखंड वाहणारे ते उत्पन्न (जीडीपी). कोविडच्या आपत्तीत जानेवारी ते डिसेंबर २०२०मध्ये जागतिक जीडीपी ४.५-६% नी कमी झाले आहे; तसेच एप्रिल २०२० ते मार्च २०२१ मध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) ७.३ टक्क्यांनी आकुंचन पावले. कोविड काळात कौटुंबिक मालमत्तेमध्ये काय बदल झाले, हे पाहणे उद्‌बोधक ठरेल.

कौटुंबिक मालमत्तेची व्याख्या करतांना वित्तीय मालमत्ता (शेअर, बँकेतील बचत) आणि अवित्तीय मालमत्ता (रियल इस्टेट) याची बेरीज करून त्यातून कुटुंबांनी घेतलेले कर्ज वजा केले जाते. मालमत्तेच्या या सर्व घटकांची आकडेवारी सहजासहजी मिळत नाही. विशिष्ट वारंवारितेने मिळणे तर फारच आव्हानात्मक असते. त्यात जागतिक पातळीवर मालमत्तेचा तौलनिक अभ्यास करावा, तर विनिमय दरांच्या फरकामुळे मालमत्तेच्या मूल्यमापनात फेरबदल होतात. या पार्श्वभूमीवर नुकताच प्रकाशित झालेला ‘क्रेडिट सुईस’चा १२ वा ‘ग्लोबल वेल्थ रिपोर्टः २०२१ उल्लेखनीय आहे.

'सांख्य’दर्शन: मालमत्तेतील घटीचा कूट प्रश्न
हल्ल्यांसाठी वाढतोय ड्रोनचा वापर; संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताकडून चिंता व्यक्त

कोविडच्या संकटात सर्व देशांच्या उत्पन्नात घट आली असतांनाही २०२०मध्ये जागतिक घरगुती मालमत्ता ७.४ टक्क्यांनी वाढली. याची दोन कारणे अनेक देशांत वेळेत जाहीर झालेल्या उपाययोजनांमुळे गरजू व्यक्तींपर्यंत पैसे पोहोचत राहिले; यामुळे या घरांच्या उत्पन्नात फारशी घट आली नाही. दुसरीकडे पुरवठासाखळ्या नीटपणे कार्यरत नसल्याने तसेच उद्याच्या चिंतेमुळे अनेक घरादारांनी खर्च कमी केले. यामुळे त्यांची बचत वाढून वित्तीय मालमत्ता वाढली. दुसरे, जागतिक पातळीवर केंद्रीय बँकांकडून प्रचंड प्रमाणात केला गेलेला पतपुरवठा. शिथिल पतधोरणांमुळे व्याजदर कमी झाले व बाजारांमधील गुंतवणूक वाढली. २०२० मध्ये एकूणच अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असतांनाही जगातील महत्त्वाच्या बाजारांमध्ये रेलचेल राहिली आहे. अर्थातच, ज्या श्रीमंत कुटुंबांनी कोविड संकटाच्या पूर्वीपासून शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनाच उंचावणाऱ्या बाजारभावाचा फायदा मिळाला. तसेच, अनेक देशांमध्ये रिअल इस्टेटचा भाव वाढून कुटुंबांच्या अवित्तीय मालमत्तेत वाढ झाली. ही वाढही श्रीमंत कुटुंबांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. तर एकीकडे आर्थिक पेच, दुसरीकडे एकूण मालमत्तेत वाढ आणि तिसरीकडे मालमत्ताधारकांमधील वाढणारी तफावत असे विचित्र वास्तव २०२० मध्ये पाहायला मिळाले.

'सांख्य’दर्शन: मालमत्तेतील घटीचा कूट प्रश्न
कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची पदवीपर्यंतची फी माफ

आता भारतातील परिस्थिती पाहूया. भारतात शेअर बाजारातील चढावामुळे वित्तीय मालमत्ता ३.८% नी वाढली, पण अवित्तीय मालमत्ता ६.८%नी कमी झालेली दिसते. कुटुंबांनी घेतलेले कर्जदेखील वाढलेले आहे. यामुळे २०२०मध्ये आपल्याकडे मात्र एकूण घरगुती मालमत्ता ४.४% नी तर दरडोई मालमत्ता तब्बल ६.१% नी कमी झाली. अर्थशास्त्रात मालमत्तेला ‘मध्यमवर्गीयांचा स्प्रिंगबोर्ड’ अशी उपमा दिली आहे. सूर मारतांना स्प्रिंगबोर्डची लवचिकता खेळाडूला अधिक वेग प्राप्त करून देते. अगदी तसेच, आर्थिक वाढीचा वेग आणि जोखीम घेण्याची ताकद मालमत्तेच्या संचयावर अवलंबून आहे. कमी झालेली मालमत्ता ही भारतासमोरच्या अनेक प्रश्नाच्या यादीतील एक कूट प्रश्न बनून उभी राहिली आहे.

देश मालमत्तेतील बदल (%) दरडोई मालमत्तेतील बदल (%)

अमेरिका १० ९.१

युरोप ९.८ ९.८

आशिया ६.७ ५

चीन ६ ५.४

भारत -४.४ -६.१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com