गोवरला रास्त मात्रा लसीकरणाचीच!

सध्या मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात गोवरच्या आजाराने पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोवरने तेरा जण दगावल्याने त्याविषयीची धास्ती वाढली आहे.
Measles
Measlessakal
Summary

सध्या मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात गोवरच्या आजाराने पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोवरने तेरा जण दगावल्याने त्याविषयीची धास्ती वाढली आहे.

सध्या मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात गोवरच्या आजाराने पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोवरने तेरा जण दगावल्याने त्याविषयीची धास्ती वाढली आहे. गोवरला चार हात लांब ठेवण्यासाठी लसीकरण हाच रास्त उपाय आहे.

सध्या चीनमध्ये कोविड थैमान घालत आहे. आपल्याकडे परत कोविड येतो की काय म्हणून जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. तोच मुंबईतील गोवरच्या बातम्यांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गोवरच्या रुग्णांचा आकडा दहा हजारच्या जवळपास असण्याची शक्यता वर्तीविली गेली आहे, तर तेरा रुग्ण दगावले आहेत. कोविडच्या साथीमुळे लहान मुलांना घराबाहेर न काढल्यामुळे बऱ्याच मुलांचे लसीकरण राहून गेले आणि गोवरने थैमान घातले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

गोवर कोणालाही होऊ शकतो. लहान मुले तसेच तरुण व्यक्ती देखील गोवरने आजारी पडू शकते. गोवर हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. हा विषाणू आरएनए गटात मोडतो. गोवरच्या आजाराचे चार टप्पे आहेत. इन्क्युबेशन पिरीयड, प्रोडॉर्मल स्टेज (सुरुवातीची अवस्था), पुरळ येणारा टप्पा, बरे होणे किंवा गुंतागुंत.

उद्भवन कालावधी

पहिला टप्पा आहे इन्क्युबेशन पिरीयड. गोवरचा इन्क्युबेशन कालावधी हा दहा दिवस असतो. या टप्प्यामध्ये गोवरचा विषाणू शरीरातील एन्डोथेलीअल सिस्टिममध्ये पसरतात आणि नंतर शरीरातील सर्व भागांमध्ये पसरतात. इन्क्युबेशनला मराठीत ‘उद्भवन कालावधी’ असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर या टप्प्यामध्ये रोग शरीरात पसरतो.

सुरुवातीची अवस्था

हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. या टप्प्यामध्ये ताप, डोळे लाल होणे, सर्दी, कोरडा खोकला अशी लक्षणे दिसतात. या टप्प्यामध्ये गोवरचे विषाणू पांढऱ्या पेशीमधील सीडी १५० आणि श्वासनलिकेतील व फुफुसातील पीव्हीआरएल ४ या रिसेप्टरवर हल्ला करतात. सीडी १५० रिसेप्टरवरील हल्ला हा इम्युन आम्नेजिया अर्थात प्रतिकारशक्तीचे विस्मरण. प्रतिकारशक्ती विषाणू व जिवाणू यांना प्रतिकार करण्यात कमी पडते.

पुरळची अवस्था

या टप्प्यामध्ये कपाळावर, कानामागे रॅश (पुरळ) येते. मग पुरळ मान, छाती, पोट, पाठ, पाय असे पसरत जातात. ५०% रुग्णांमध्ये हातापायावर देखील पुरळ येतात. कॉपलिक स्पॉट म्हणून गालाच्या आतमध्ये निळसर पांढरे ठिपके हे गोवरमध्ये आढळून येतात. पुरळ आल्यावर ताप कमी होण्यास सुरुवात होते. पण खोकला वाढू शकतो. काही रुग्णांना मानेत छोट्या गाठी येतात, ज्याला बहुतांश लोकं टॉन्सिलच्या गाठी म्हणतात.

गुंतागुंतीचा चौथा टप्पा

पाच वर्षाच्या आतील मुले आणि वीस वर्षांवरील व्यक्ती यांना गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. गोवरमध्ये होणाऱ्या गुंतागुंती - न्युमोनिया, मेंदूज्वर (इंकेफालायटीस), अतिसार, कानाचे इन्फेकशन, ब्लॅक गोवर. गोवरमध्ये जे मृत्यूचे प्रमाण आहे त्यात न्युमोनिया व मेंदूज्वर हे मुख्यत्वे आहेत. हे सर्व प्रश्‍न गोवरनंतर लगेचच येतात. इम्युन आमनेजिया हा दोन-तीन वर्षे त्रास देऊ शकतो. जुना टीबी देखील उफाळून येऊ शकतो. सबॲक्युट स्क्लेरॉजिंग इंकेफालायटीस ही गुंतागुंत गोवरनंतर सात ते तेरा वर्षांनी होते. साधारण एक लाखामध्ये एकास होते. हे स्लो विषाणूचे इन्फेक्शन आहे. यात फिट येतात, बेशुद्धावस्था येऊ शकते आणि मृत्यू देखील येऊ शकतो.

निदान - गोवरची आयजीएम ही तपासणी - पुरळ येऊ लागल्यानंतर तीन दिवसांनी ही चाचणी पॉझिटिव्ह येते. नंतर साधारण तीस दिवस पॉझिटिव्ह राहते.

संसर्गजन्य गोवर - साधारणतः ताप आल्यापासून ते पुरळनंतर तीन-चार दिवस गोवरचा रुग्ण गोवरचे विषाणू वातावरणात सोडत असतो. हा विषाणू हवेतून ड्रॉप्लेट्समार्फत पसरतो.

उपचार - गोवरवर उपचार नाहीत. लक्षणानुसार उपचार केले जातात. जसे की तापाचे औषध, व्हिटॅमिन ए, भरपूर पाणी, खाणे आणि झालेल्या गुंतागुंतीवरचे उपचार.

अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद करू इच्छितो की, गोवरच्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांसाठी - गोवरची लस हे खूप प्रभावी लस अस्त्र आहे. गोवरच्या रुग्णाच्या संपर्कात आल्यावर ७२ तासांच्या आत लस घेतल्यास आजार सौम्य होऊ शकतो. इम्युनो ग्लोब्युलीन हा एक प्रतिकारशक्ती कमी असलेल्या वर्गासाठी उपचार केला जातो.

गोवर होणे टाळावे कसे? यावर एकच प्रभावी पर्याय आहे तो म्हणजे लसीकरण. एमएमआर किंवा एमआरची लस. लस घेतल्यावर लगेचच प्रतिकारशक्ती येत नाही. त्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. म्हणून विनंती की, आपण लसीकरण झाले आहे की नाही बघून घेणे व लस घेणे. एका डोसने पूर्ण प्रतिकारशक्ती येत नाही. त्यामुळे दोन किंवा तीन डोसची गरज भासते. प्रौढ व्यक्ती देखील ही लस घेऊ शकतात. लस घेणे हीच गोवर टाळण्याचा रामबाण उपाय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com