covid-19 - दुसरी लाट येऊ नये म्हणून...

corona
corona

नवीन कोविड रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असून, गंभीर रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. हा मोठा दिलासा असला, तरी हे संकट पुन्हा ओढवू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. 

सध्या महाराष्ट्रातील नवीन कोविड रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असून, गंभीर रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे, ही दिलासादायक गोष्ट आहे. आपण सगळेच  लॉकडाउन, कोरोनाची मरणाची भीती, लॉकडाउनमुळे झालेले आर्थिक आणि सामाजिक परिणाम, यामुळे वैतागून गेलेलो होतो. सध्या एकेक गोष्ट टप्प्याटप्प्याने सुरू होते आहे. जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येताना दिसत आहे, ही आपल्या प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट आहे.

पण...! हा ‘पण’ या सगळ्या आनंदावर विरजण टाकणारा आहे. आपण या ‘पण’कडे इतके रागारागाने पाह्यला नको, याचे कारण या ‘पण’चा हेतू सावध करण्याचा आहे. अनेक देशांत कोरोनाची दुसरी लाट येताना  दिसते आहे. 

युरोपमधील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, बेल्जियम या देशांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. काही देशांनी पुन्हा लॉकडाउन जाहीर केला आहे. हे युरोपातील देश आहेत, म्हणून आपल्याला दुर्लक्ष करुन चालणार नाही, याचे कारण अगदी आपला सख्खा शेजारी असणाऱ्या या  पाकिस्तानात पंतप्रधानाचे सार्वजनिक आरोग्य सल्लागार असणा-या डॉ. फैजल सुलतान यांनी त्यांच्याकडे करोनाची दुसरी लाट सुरु झाल्याची कबुली २८ऑक्‍टोबरला दिली आहे. 

आपल्याकडेही दिल्ली आणि इतर काही राज्यांत कोरोना पुन्हा तोंड वर काढताना दिसत आहे.

दुसऱ्या लाटेची कारणे
अनेक देशांत दुसरी लाट का आली आहे किंवा आपल्याकडेही ती येण्याची शक्‍यता का आहे? तज्ज्ञांच्या मते या लाटेची काही कारणे आहेत. एकतर हिवाळा. हिवाळ्यात कमी तपमान आणि कमी आर्द्रता यामुळे कोरोनासारखे विषाणू श्वसनसंस्थेच्या स्त्रावामध्ये अधिक काळ तग धरतात. वा-याचा वेग कमी असल्याचाही फायदा विषाणू प्रसाराला होतो. 

यावेळी उत्तर भारतात थंडीची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. असे झाले तर ते कोरोना प्रसाराला अधिक पोषक ठरेल, अशी भीती आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिवाळ्याशिवाय दिवाळी आणि सणासुदीचे दिवस आता येताहेत. लॉकडाउन संपल्यामुळे आणि दिवाळीमुळे वैयक्तिक, सामाजिक गाठीभेटी वाढणार आहेत. बाहेर गर्दी कमी केली तरी घरगुती गर्दी वाढणार आहे, या सगळया कारणामुळे कोरोना वाढण्याची साधार भीती आहे. स्वाईन फ्ल्यूदेखील हिवाळ्यात वाढतो, हे आपल्या नित्य अनुभवाचे आहे. या दोन्ही आजाराची प्रसाराची पद्धत बरीचशी  एकसारखी आहे.

आपल्यापैकी अनेकांना दुस-या लाटेची कल्पनाही नकोनकोशी झालेली आहे आणि ते स्वाभाविक आहे. आपल्याकडे अशी दुसरी लाट आली तर त्यासाठी आरोग्ययंत्रणा तयारी करते आहे. पण मुळात अशी दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण सर्वांनी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपण काय करु शकतो? आपले कोविडअनुरुप वागणे म्हणजे दिवाळीचा एकेक दिवा लावणे आहे, एकमेकांची काळजी घेणे, सहकार्य करणे म्हणजेअंगणातील  आकाशकंदील उजळणे आहे. आपल्याला कोविडची दुसरी लाट नको असेल तर हे साधेसोपे नियम पाळू या. आणि आनंदी मनाने एकमेकांना ‘हॅपी दिवाळी’ म्हणू या !

‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींबाबतची काळजी
आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने ज्या व्यक्तींचा जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क अधिक असतो, अशा व्यक्तींच्या माध्यमातून कोविड आजाराचा प्रसार अधिक वेगाने होतो, हे अनेक अभ्यासांतून पुढे आले आहे. दुसरी लाट येण्यामध्येही अशा ‘सुपर स्प्रेडर व्यक्ती’ कारणीभूत ठरू शकतात. लहान-मोठे व्यावसायिक, घरगुती सेवा पुरविणारे अनेक जण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काम करणारे लोक, आवश्‍यक सेवा पुरविणारे शासकीय, निमशासकीय लोक या साऱ्या मंडळींचा जनसंपर्क अधिक असतो, त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग झाला तर तो समाजात वेगाने पसरू शकतो. म्हणून, अशा व्यक्तींनी आपली लक्षणे अंगावर काढता कामा नयेत. अगदी सौम्य लक्षणे असतानाच टेस्ट करून घेणे, वैद्यकीय सल्ला घेऊन विलगीकरणात राहणे आवश्‍यक आहे.

स्‍वच्‍छता, स्‍वयंशिस्‍त, संयम
अनलॉकमध्ये शिस्त पाळूया

कोविड आजार कमी झालेला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही, हे लक्षात घेऊन आपल्या नेहमीच्या वागण्यात खबरदारी घेण्याची गरज आहे.

बाहेर पडताना, समूहात असताना  मास्क वापरणे आवश्‍यक आहे, हे भान कायम सांभाळूया. 

हातांची आणि नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, ही चतुःसूत्री आपल्या नेहमीच्या वागण्याचा भाग असला पाहिजे. पण, याशिवाय सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, थुंकणे टाळणे अतिशय आवश्‍यक आहे.

ज्‍येष्ठ नागरिक, अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या.
कोणीही आपली कोविडसारखी लक्षणे न लपविता आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे आवश्‍यक आहे. अनावश्‍यक प्रवास टाळले पाहिजेत.

फटाकेमुक्त दिवाळी साजरी  करूया. करोनामुळे अनेकांना न्यूमोनिया, श्वसनास त्रास  झाला आहे, होतो आहे. हिवाळ्यातील प्रदूषण कोरोनावाढीला कारणीभूत होऊ शकते, हे लक्षात घेऊन  आपण ही दिवाळी फटाकेमुक्त दिवाळी  म्हणून साजरी करायला हवी. फटाक्‍यांमुळे झालेल्या प्रदूषणामुळे आपल्या श्वसन संस्थेची, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. कोविडचा सामना करायचा तर आपली  फुप्फुसे दणकट हवीत. म्हणूनच, या दिवाळीचा आनंद भरभरून घ्यायचा असेल  तर फटाके नकोत.

(लेखक एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्राचे ‘राज्य सर्वेक्षण अधिकारी’ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com