'कोविड' चाचण्या नि उपयोग

Covid-Test
Covid-Test

‘कोविड-१९’चे रुग्ण वाढत चालले आहेत. बऱ्याच ठिकाणी शारीरिक परिस्थिती व लक्षणे स्थिर असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. ‘कोविड-१९’चा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाल्यास तुम्ही होम आयसोलेशनमध्ये असाल, तरीही काही वैद्यकीय चाचण्या करायला सांगितले जाते. या चाचण्यांचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. या चाचण्या कोणत्या व त्यांतून काय निष्पन्न होते, हे जाणून घेऊ.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कोरोना’ चाचण्यांची माहिती घेण्याआधी सायटोकाइन्स म्हणजे काय, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सायटोकाइन्स हे सेल सिग्नलिंग घटक आहेत, जे पेशींना रोगप्रतिकारक प्रतिक्रियांमध्ये सेल संप्रेषणास मदत करतात आणि दाह, संसर्ग आणि आघात असलेल्या जागी पेशींच्या हालचालीला उत्तेजन देतात. साइटोकिन्स अणूंचे एक मोठे कुटुंब आहे, जे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकृत केले जाते. 

सी रीॲक्‍टिव्ह प्रोटीन :
आपल्या प्रतिकार शक्तीमधील सायटोकाइन्स रोगजनकांविरुद्ध लढा उभारतात. मात्र, सिस्टिम हायपरॅक्‍टिव्ह झाल्यावर ते साइटोकिन्स फुफ्फुसाच्या व इतर उतींना हानी पोचवते. संसर्गासंबंधित मेदयुक्त नाश, दाहक प्रतिक्रिया आणि शरीराची अंतर्गत सूज ही सी रीॲक्‍टिव्ह प्रोटीनची पातळी वाढवते. ही पातळी संसर्गाची तीव्रता, रोगनिदान आणि रोगनिदानविषयक देखरेखीची तीव्रता यांसदर्भात मदत करते. 

फेराटिन :
मॅक्रोफेजेस नावाच्या पेशी फेराटिन सक्रिय करतात व त्या मॅक्रोफेजेस साइटोकाईन सक्रिय करतात. ठराविक पातळीत, ते शरीरासाठी सुरक्षित असतात आणि विषाणू आणि जीवाणूंपासून त्याचे संरक्षण करण्यास मदत करतात. फेराटिनचे उच्च प्रमाण म्हणजेच हायपर फेराटिनेमिया साइटोकाईनचे प्रमाण अतिउच्च करू शकते (ज्याला साइटोकाईन स्ट्रॉम म्हणतात.) जे बऱ्याच रुग्णांसाठी प्राणघातक ठरू शकते. 

डी-डायमर :
डी-डायमर एक प्रोटीन आहे व ते रक्ताची गाठ विरघळल्यावर तयार होते. मोठ्या संख्येने गुठळ्या विरघळल्यावर डी-डायमरची पातळी वाढते. त्याच्या असंतुलित पातळीमुळे दाह आणि रक्तवाहिन्यांत गुठळ्या वाढण्याची शक्‍यता असते. डी-डायमर पातळी वाढलेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या टाळण्यासाठी उपचारांची अंमलबजावणी करता येते. 

आयएल -६ :
रुग्णांमध्ये बऱ्याच सायटोकिन्स सायटोकाईन स्ट्रॉममध्ये भाग घेतात; तथापि, एक महत्त्वपूर्ण भूमिका ‘आयएल -६’द्वारे बजावली जाते. त्याची रक्तामधील खूप वाढलेली पातळी श्वसनसंस्थेच्या कार्यात अढथळा आणते, शरीरामध्ये तीव्र दाह तयार करते व त्यामुळे इतर अनेक त्रास उद्भवतात. ही तपासणी करून फुफ्फुसांच्या उतींचे नुकसान व वाढणारा आजार रोखण्यास कोणते उपचार करावे, हे वैद्यकीय तज्ज्ञांना समजण्यास मदत होऊ शकते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com