आयआयटी मुंबईतर्फे मूड इंडिगो

मुंबईमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी, मुंबई) ही देशातील तंत्रविषयक शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे.
My Mood Indigo
My Mood Indigosakal
Summary

मुंबईमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी, मुंबई) ही देशातील तंत्रविषयक शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे.

मुंबईमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी, मुंबई) ही देशातील तंत्रविषयक शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे. तिला खूप मोठा वारसा लाभला असून, तिने अनेक क्षेत्रांतील अग्रगण्य उद्योजक तयार केले आहेत. ‘मूड इंडिगो’ हा आयआयटी मुंबईचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव असून, तो कॉलेज विश्वातील आशिया खंडातील सर्वांत मोठा महोत्सव म्हणून ओळखला जातो. ‘मूड इंडिगो’ला गेल्या ५१ वर्षांचा इतिहास असून, तो दरवर्षी नवनवे उच्चांक प्रस्थापित करीत आहे.

या महोत्सवात मॅजिक, माईक पोर्टनॉय, प्रोक्युपाइन ट्री, सिंपल प्लॅन या आंतररराष्ट्रीय, तसेच केके, अमित त्रिवेदी, प्रतीक कुहाड, झाकिर खान, शंकर-एहसान-लॉय, विशाल शेखर, आशा भोसले, उस्ताद झाकिर हुसेन अशा अनेक भारतीय कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. जगभरातील या कलाकारांनी वेगवेगळ्या जॉनरची कला सादर करत रसिकांनी मंत्रमुग्ध केले आहे. ‘मूड इंडिगा’लो अनेक सेलिब्रिटी व मान्यवरांनी हजेरी लावली असून, यामध्ये अक्षयकुमार, दीपिका पदुकोण, आमीर खान, शशी थरूर, स्मृती इराणी, अनुराग कश्यप, शाहीद कपूर, इम्रान खान, आयुष्यमान खुराणा, देवेंद्र फडणवीस, किरण बेदी यांचा समावेश आहे.

‘मूड इंडिगो’च्या आधी होणारा सर्वांत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे कॉलेज कनेक्ट कार्यक्रम. या कार्यक्रमात ‘मूड इंडिगो’ सर्व कॉलेजेसपर्यंत पोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. मागील वर्षी यामध्ये ४ हजारांपेक्षा अधिक कॉलेजमधील ४५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. कॉलेज कनेक्ट कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अविस्मरणीय अनुभव मिळतो, भव्य कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, समविचारी विद्यार्थ्यांशी सामाजिक संबंध वृद्धिंगत करता येतात व त्यातून आपल्या व्यावसायिक प्रयत्नांत त्यांची मदत घेता येते.

थोडक्यात, कॉलेज कनेक्ट कार्यक्रमाचा भाग बनलेले विद्यार्थी आपापल्या शाळा, कॉलेज आणि शहरांत ‘मूड इंडिगो’चे राजदूत बनतात. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशभरातील कॉलेजेसमधील विद्यार्थी या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमात सहभाग होतात आणि त्यांना दिलेले टास्क पूर्ण करतात व त्यासाठी दिली जाणारी बक्षीसे मिळवतात. यामध्ये ३५० इंटर्नशिप, १०० मोफत अभ्यासक्रम, डिजिटल मार्केटिंग प्रमाणपत्र, वस्तूंच्या विक्रीची संधी अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. विद्यार्थी केवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या मोफत वर्कशॉपमध्येही सहभागी होऊ शकतात. काही पात्र विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईमध्ये येण्याची संधी मिळते व त्यांना ‘मूड इंडिगो’ची अंमलबजावणी करणाऱ्या टीमबरोबर काम करण्याची संधी मिळते.

या उपक्रमाचा भाग होण्यासाठी तुम्हाला कॉलेज कनेक्ट कार्यक्रमाच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, ती डिसेंबरपर्यंत खुली राहील.

रजिस्ट्रेशनसाठी पत्ता - my.moodi.org.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com