Diwali Special Story: एक दिवाळी अशीही..!

A Unique Diwali Story with a Special Message for Everyone: एक दिवाळी अशीही..! नेहमीच्या उत्सवापेक्षा वेगळी, मनाला भावणारी कहाणी
Unique Diwali Celebration Shows How People Celebrate the Festival of Lights with Love Care and Social Responsibility

Unique Diwali Celebration Shows How People Celebrate the Festival of Lights with Love Care and Social Responsibility

sakal

Updated on: 

एक दिवाळी अशीही..!

आजची तिथी : श्रीपराभव नाम संवत्सर श्रीशके १९४८ आश्विन नरक चतुर्दशी.

आजचा वार : संडेवार!

आजचा सुविचार : लखलख चंदेरी तेजाची ही न्यारी दुनिया...थरारती ज्योती ज्योती...हां हां हां हां!!

न मो नमः नमो नमः नमो नम: नमो नमः (१०८ वेळा लिहिणे) मन प्रसन्न आहे. ‘उठा उठा दिवाळी आली,’ असे कुणीतरी दारावर ठकठक करून गेले. किती जोरात ते दार ठोठावणे!! गोल साबणाच्या वडीचा उपयोग दार ठोठावण्यासाठी अधिक की स्नानासाठी अधिक हे हल्ली कळेनासे झाले आहे. वडी कसली, वडाच तो! असो. तात्पर्य एवढेच की पहाटे उठलो. अंगाला तेलउटणे उटणे चोपडले. उटणे नावाचे प्रकरण अंगाला लावणे एकवेळ क्षम्य आहे, पण ते चेहऱ्याला फासताना वेगळेच वाटते. असो!! उटणे लावून स्नानाच्या वेळी मनातल्या मनात काँग्रेसच्या नरकासुराचे स्मरण करून टांचेखाली चिरांटे चिरडले. है शाब्बास! फेक नॅरेटिवच्या या नरकासुराला जनता अशीच २०२९मध्ये चिरडेल, असा मला विश्वास आहे...

Loading content, please wait...