दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळीच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत.
मानवी आहारातील पूर्णान्न म्हणजे दूध. भूक भागविण्याबरोबरच भरपूर पोषणमूल्येही त्यातून मिळतात. पारंपरिक खाद्यपदार्थांपासून ते अगदी प्रक्रिया केलेल्या मिठायांमध्येही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर होतो. सणावाराच्या दिवसांमध्ये त्यांची मागणी प्रचंड वाढते, त्याबरोबर त्यामधील भेसळीचे प्रकारही बोकाळतात.