जोवर अंगलट येत नाही, तोवर ट्रम्प यांच्या हास्यजत्रेचा आनंद लुटावा, हे खरे. या आनंदावर तूर्त तरी ट्रम्प यांनी आयातशुल्क लावलेले नाही!
विख्यात हसवणूककार चार्ली चॅप्लिनचा एक नितांतसुंदर चित्रपट आहे- सिटी लाइट्स. या चित्रपटातील चॅप्लिनच्या त्या प्रसिद्ध ‘ट्रॅम्प’ म्हणजे, भणंगाला मद्यधुंद अवस्थेतला एक धनवंत भेटतो. त्या धनवंताला आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या चॅप्लिनला तो दारुडा अगदी प्रेमाने आपल्या महालसदृश घरी नेतो, खाऊपिऊ घालतो.