

Nitin Naveen, newly appointed BJP National Working President
Sakal
केंद्रातील सत्ता तसेच भाजप पक्षसंघटनेची सूत्रे हाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे विश्वासू सहकारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या धक्कातंत्राची मालिका न संपणारी आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे उत्तराधिकारी कोण? हा प्रश्न २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून भाजपला सतावत होता. सत्ता ‘संतुलन’ साधण्यासाठी नव्या अध्यक्षाची निवड करताना संघाची पसंतीही विचारात घेतली जावी, अशी चर्चा गेल्या दीड वर्षापासून ऐकायला मिळत होती.