

Cancer Statistics Play a Key Role in the Fight Against Cancer Through Early Detection Research and Better Healthcare Planning
sakal
-ज्योत्स्ना गोविल
कर्करोगाची नेमकी आकडेवारी मिळणे महत्त्वाचे आहे. भारताच्या या रोगाविरुद्धच्या लढाईत ती उपयुक्त ठरेल. लढाईचे नियोजन अधिक प्रभावी करू शकते. त्यामुळेच तिची योग्य नोंद आणि विश्लेषण होणे गरजेचे आहे.
कर्करोगामुळे रुग्णांच्या कुटुंबांवर आणि आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण येतो. या आजाराचे निदान कुठे होते, कोणत्या वयोगटातील आणि लोकसंख्येतील व्यक्ती त्याला अधिक बळी पडतात आणि सर्वाधिक रुग्णभार कोणत्या भागात आहे, याची नेमकी माहिती नसेल, तर आरोग्यसेवा आणि उपलब्ध साधनांचे योग्य नियोजन करणे कठीण ठरते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कर्करोगाची अनिवार्य नोंदणी करण्याबाबत केलेला हस्तक्षेप महत्त्वाचा ठरतो.