
दिव्याने बुद्धिबळ विश्वकरंडक जिंकण्याची कामगिरी ही देशासाठी अभिमानास्पद आहे, त्याचबरोबर तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
कधी कधी काळ जणू स्तब्ध होतो. एका क्षणी. एका श्वासामध्ये संपूर्ण इतिहास सामावतो. असाच एक क्षण आला तो २८ जुलै २०२५ या दिवशी. जेव्हा नागपूरमधील मराठमोळ्या, अवखळ, हसतमुख, पण धैर्यशील दिव्या देशमुखने अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला आणि बुद्धिबळाचा विश्वकरंडक जिंकला.