

Devendra Fadnavis Maharashtra Budget 2026 Speech
esakal
प्रगत आणि पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचेच लक्ष असते. याचे कारण देशाने पुढच्या काळासाठी अर्थव्यवस्थेविषयी जी उद्दिष्टे ठरवली आहेत, त्यांच्या पूर्ततेमध्ये ज्या राज्यांचा वाटा लक्षणीय असेल, त्यात महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे. यापूर्वी नऊ अर्थसंकल्प सादर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळचा अर्थसंकल्प सादर करावा लागला. त्यांनी महाराष्ट्र विकासाच्या मार्गाने कशाप्रकारे भरधाव वाटचाल करीत आहे, हे सांगतानाच योजना आणि घोषणांची बरसात केली. त्यात सर्वांत प्रमुख घोषणा ही शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखांपर्यंत माफ करण्याची आहे. याशिवाय ‘लाडक्या बहिणीं’साठी तरतूदही करण्यात आल्याने ही योजना चालू राहणार हे स्पष्ट झाले.