

कधी लोकशाहीबद्दल चिंता, तर कधी मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याचा ओरडा करीत पाश्चात्त्य देश स्वतःकडे ‘न्यायाधीशा’ची भूमिका घेतात.
जगाच्या बहुतांश भागावर एकेकाळी साम्राज्य निर्माण करणाऱ्या ब्रिटनची अवस्था आज बरीच ढेपाळलेली झाली असली तरी त्या साम्राज्यवादी अहंकाराचे अवशेष नाहीसे झालेले नाहीत. तो अहंकार कोणत्या ना कोणत्या कारणाने फणा वर काढतोच.