केवळ राजकारणासाठी एका शैक्षणिक स्वरूपाच्या वादाला मराठी भाषक विरुद्ध हिंदी भाषक असेल वळण देणे देशाच्या हितावर घाला घालणारे आहे.
सध्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही वाचाळवीरांची कमतरता नाही. बरेच गणंग मिळेल त्या व्यासपीठावर आपली अक्कल पाजळत असतात आणि समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांमुळे त्यांनी ओकलेल्या गरळीची विषबाधा दूरपर्यंत पोचते.