Diwali on Farm: बांधावर व्हावी रोजच दिवाळी!

A Heartwarming Message for Farmers and Rural Maharashtra: शेतशिवारात सुख-समृद्धी नांदो; शेतकऱ्यांसाठी खास संदेश, ‘बांधावर व्हावी रोजच दिवाळी!’
Everyday Diwali on the Farm A Special Tribute to Farmers Their Hard Work and the Joy of Agricultural Life in Rural India

Everyday Diwali on the Farm A Special Tribute to Farmers Their Hard Work and the Joy of Agricultural Life in Rural India

sakal

Updated on: 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मंत्र्यांसह शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली, हा उपक्रम स्वागतार्ह आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सरकार सहभागी असल्याचा संदेश जातो. मात्र, केवळ सणासुदीला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आनंद साजरा करण्याबरोबरच त्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी आनंद निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतीमालाचे घसरते भाव, वाढता उत्पादनखर्च आणि कर्जाचा बोजा अशा अनेक संकटांनी शेतकरी वर्षभर

त्रस्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी केवळ एका दिवसापुरती

गोड न राहता दरवर्षी आनंदाची व्हावी, यासाठी सरकारने ठोस, दूरगामी

आणि परिणामकारक धोरणे राबविण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी साजरी केलेली दिवाळी ही केवळ प्रतीकात्मक

न राहता शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या ठोस निर्णयांची

सुरुवात ठरली पाहिजे.

काळ्या मातीत राबतो, घाम गाळतो शेतकरी,

तरी सुखाच्या दिव्यासाठी, आसुसते त्याची झोपडी.

कधी निसर्गाचा कोप, कधी बाजाराचा वार,

कधी उजाडेल त्याच्या आयुष्यात खऱ्या सुखाचा सणवार?...

Loading content, please wait...