ब्रँड झटपट प्रस्थापित करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त जोखीम पत्करणाऱ्या कंपन्या गेल्या दोन दशकांत भारतीय क्रिकेट संघाच्या प्रायोजक झाल्या. नव्या कायद्याने त्यांचा बाजार उठला आहे.
दर्जेदार उत्पादनांना महत्त्व न देता थेट झटपट कमाईच्या महत्त्वाकांक्षेपोटी कोट्यवधी ग्राहकांच्या बाजारपेठेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला की काय होते, याची ठळक उदाहरणे म्हणजे गेल्या दशकभरात भारतीय क्रिकेट संघाला प्रायोजित करणाऱ्या कंपन्या.