
सरकारी सेवेचा दर्जा उंचावणे, कामाची गती वाढणे आणि गुणवत्तावाढ हा सुधारणांचा केंद्रबिंदू असला पाहिजे. त्या सुधारणा झाल्या तर वेतन आयोगाची स्थापना हे एक सकारात्मक पाऊल ठरू शकेल.
कोणे एकेकाळी देशभरातील तमाम मध्यमवर्गीय कुटुंबात, ‘खुश हैं जमाना आज पहली तारीख हैं’ हे गीत मोरपीस फिरवल्यासारखे वातावरण निर्माण करायचे. याचे कारण पगाराने गरम होणारा खिसा आणि त्यामुळे होणारी सुखाची पखरण. काळ पुढे सरकत गेला आणि सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा खासगी तसेच संघटित व असंघटित क्षेत्रातील रोजगार वाढत गेला, सरकारी नोकऱ्या घटायला लागल्या तसतसे त्या गीतामागील अप्रुपही कमी होत गेले.