
The Controversy Over Voter Lists and the EC's Functioning Demands Immediate, High-Priority Electoral Reforms.
Sakal
भारतातील निवडणूकप्रक्रियेवर वारंवार शंका उपस्थित केल्या जात असून, अशा प्रकारचे संशयाचे जाळे तयार होणे ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. स्वायत्त निवडणूक आयोग हे आपल्या लोकशाहीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पण या आयोगाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल, तर त्यात सुधारणा करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व विरोधी पक्ष या मुद्यावर एकत्र आले असून त्यांनी उपस्थित केलल्या प्रश्नांच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे मतदारयाद्यांतील घोळ. खरे तर याआधीच लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप घेतले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत शहानिशा झालेली नाही.