

Farmer Debt Crisis in Maharashtra
Sakal
देश एकीकडे जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगताना, पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत आहे, त्यासाठी ‘विकासा’चा डिंडिम सतत पिटला जात आहे; परंतु याच देशात चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःचे मूत्रपिंड (किडनी) विकावे लागते,ही हादरवून टाकणारी घटना आहे. आपल्या व्यवस्थेत हा अंतर्विरोध, ही दरी कशामुळे तयार झाली, याचा विचार करण्याची आज नितांत गरज आहे. त्या शेतकऱ्याची सर्वसामान्यांचे काळीज पिळवटून टाकणारी कहाणी राज्यकर्त्यांच्या काळजाला भिडते की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.