संपत्तीचे प्रतीक याबरोबरच सोने हे सार्वभौमत्व जपण्याचेही एक साधन ठरते आहे.
जगातील भू-राजकीय परिस्थितीत निर्माण झालेली अनिश्चितता, चिघळणारे संघर्ष, अमेरिकेची दोलायमान आर्थिक धोरणे यांमुळे जे सर्वव्यापी परिणाम अनुभवाला येत आहेत, त्यातीलच एक म्हणजे सोन्याची वाढती महती. हा तेजस्वी धातू आपल्याकडे प्रचंड ‘भाव’ खातोय. दहा ग्रॅमचा भाव आता सव्वा लाखाच्या घरात गेला आहे.