अग्रलेख : कठीण समय येता...

जागतिक युद्धसदृश परिस्थितीत अर्थकारण, ऊर्जा सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चिंतनशील अग्रलेख...
Global Conflicts and Rising Economic Pressure

Global Conflicts and Rising Economic Pressure

Sakal

Updated on

युद्धज्वर चढलेल्यांना वेसण घालायची तरी कशी, असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी प्रतिबंधात्मक (डिटरंट) असा एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे अर्थकारणाच्या मर्यादा.

युद्धाच्या खुमखुमीची लागण झालेल्या व्यक्ती सर्वोच्च सत्तास्थानी असल्या की साऱ्या जगालाच त्याची दाहक झळ कशी बसते, याचा अनुभव सध्या आपण घेत आहोत. अशांना आवर घालण्यास देशांतर्गत दबाव, संयुक्त राष्ट्रांनी केलेले आवाहन किंवा मित्रांनी सांगितलेल्या चार समजुतीच्या गोष्टी वगैरे काहीच कामी येत नाही, याचीही प्रचीती येत आहे. मग या युद्धज्वर चढलेल्यांना वेसण घालायची तरी कशी, असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी प्रतिबंधात्मक (डिटरंट) असा एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे अर्थकारणाच्या मर्यादा. अमेरिका व इस्राईलने इराणवर हल्ला चढवून सुरू केलेल्या युद्धाला तीन आठवडे झाले असून त्यावर झालेल्‍या प्रचंड खर्चाचे आकडे छाती दडपून टाकणारे आहेत. अमेरिकेचाच रोजचा युद्धखर्च एक अब्ज डॉलर असल्याचे सांगण्यात येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com