

Passengers stranded across major airports after Indigo Airlines failed to comply with new DGCA pilot duty rules
sakal
केंद्राच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने आठ जानेवारी २०२४ रोजी वैमानिकांच्या कामांच्या तासांसंबंधात नवे नियम जाहीर केले. ते एक जुलै २०२४ पासून अंमलात येणे अपेक्षित होते. पण नव्या नियमांची अंमलबजावणी करणे म्हणजे शेकडोंच्या संख्येने वैमानिकांची भरती करावी लागणार. मग नफ्याला कात्री लागणार. त्यामुळे विमान कंपन्यांना, विशेषतः भारतातील प्रवासी हवाई वाहतुकीमध्ये ६४.२ टक्क्यांच्या वाट्यासह मक्तेदारी प्रस्थापित करणाऱ्या ‘इंडिगो एअरलाईन्स’च्या मनात या नियमांचे अनुपालन करायचे नव्हते, हे वीस महिन्यांपासून ‘इंडिगो’च्या टाळाटाळीच्या वर्तनातून दिसत होते.