Global Recognition of Women Farmers
Sakal
editorial-articles
अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान
महिलांना त्यांचे हक्क, अधिकार प्रदान करून त्यांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हे वर्ष शेतकरी महिलांना समर्पित केले आहे. शेतकरी महिलांचा हा सन्मान आनंद देणारा आहे.
सर्वसामान्य भारतीयांना शेती आणि महिला म्हटले, की डोळ्यासमोर येते ते पासष्ट वर्षांपूर्वीचे ‘मदर इंडिया’ चित्रपटाचे पोस्टर! एका बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेऊन, शेती कसणारी, न्यायी आणि परिस्थितीला शरण न जाणारी लढाऊ, खंबीर स्त्री! खरे सांगायचे तर जागतिक पातळीवर हेच प्रातिनिधिक चित्र आजही कायम आहे. वेळोवेळी झालेला अर्थशास्त्रीय, सांख्यिकी अभ्यास हेच चित्र आपल्यासमोर आणतो. उद्योगांसाठी तयार होणारे भांडवल हे शेतकऱ्यांच्या शोषणातून उभे केले जाते, हे जगात अनेक ठिकाणी घडले आहे; भांडवलशाही असलेल्या देशांत आणि अगदी सोव्हिएत संघराज्यातही. त्यातही या श्रमाचा, शोषणाचा फटका शेतावर काम करणाऱ्या महिलांना जास्त बसतो.

