‘आयपीएल’ करंडकाचे ब्रँड मूल्य दिसामासाने वाढायला हवे, यासाठीच सगळा डोलारा उभा केला जातो, हे लक्षात घ्यायला हवे. त्यात किती वाहवून जायचे, याचा विवेक गमावणे प्रचंड महागात पडते.
खरे तर ‘आयपीएल’ हे काही खरेखुरे क्रिकेट नव्हे. ‘आयपीएल’ला क्रिकेट नावाचा सदाबहार खेळ म्हणायचे तर, एखाद्या पाश्चात्य ठेक्यावरच्या दिलखेचक पंजाबी ‘इंडिरॉक’ गाण्याला अभिजात म्हणावे लागेल. अभिजात क्रिकेटचे किट चोरून गल्लीतल्या पोरांनी डाव रंगवावा, तसा हा रंगीतसंगीत उरुस आहे.