ऑस्ट्रेलियात आढळणारा कांगारु हा तसा निर्मळ प्राणी. आपण बरे, आणि आपल्या पोटाच्या पिशवीतले पोर बरे, अशा वृत्तीने जगणारा. पण हाच प्राणी आक्रमक झाला की दणका देतो. ‘कांगारु म्हणाले, माझे काय? माझे काय? हाहाहा, शेपटी म्हणजे पाचवा पाय’ अशी ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या एका बालगीतातली ओळ होती. त्या ओळीतलाच हा पाचवा पाय जेव्हा समाजमाध्यमी राक्षसी कंपन्यांना दणका देतो, तेव्हा त्याची बातमी होते.