Kojagiri Purnima 2022: आटलेल्या दुधाचे आयुर्वेदिक आणि मनोवैज्ञानिक महत्त्व काय? जाणून घ्या...

भारत हा उत्सवप्रिय देश आहे. भारतीय संस्कृती देववाणी संस्कृत भाषेच्या आश्रयाने आहे. त्यामुळे आपल्या अनेक उत्सवांचे मूळ विविध संस्कृत ग्रंथांत सापडते.
Kojagiri Purnima 2022 full moon month of Ashwin is called Ashwin Poornima or Sharad Poornima
Kojagiri Purnima 2022 full moon month of Ashwin is called Ashwin Poornima or Sharad PoornimaEsakal
Summary

आश्विन महिन्यातील पौर्णिमेला आश्विन पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात आणि तीच ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणून ओळखली जाते

भारत हा उत्सवप्रिय देश आहे. भारतीय संस्कृती देववाणी संस्कृत भाषेच्या आश्रयाने आहे. त्यामुळे आपल्या अनेक उत्सवांचे मूळ विविध संस्कृत ग्रंथांत सापडते. आश्विन महिन्यातील पौर्णिमेला आश्विन पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात आणि तीच ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणून ओळखली जाते. आज साजऱ्या होणाऱ्या कोजागरी पौर्णिमेच्या सांस्कृतिक महत्त्वाबद्दल!

- प्रा. अतुल अरविंद तरटे

महालक्ष्मी माता या पौर्णिमेला चंद्र मंडळातून थेट पृथ्वीवर उतरते आणि ‘को जागर्ति’, अर्थात कोण जागत आहे, असे विचारते. या प्रश्नात फार मोठा आशय दडला आहे. महालक्ष्मी माता विचारते, निसर्ग नियमांबाबत कोण सजग आहे? आपल्या प्रत्येक कर्तव्याबाबत कोण जागृत आहे? आपल्या राष्ट्राचे हित साधण्यात कोण जागे आहे? आणि मातेला जे साधक या कसोट्यांवर खरे उतरणारे दिसतात, त्यांना महालक्ष्मी माता भरभरून वरदान देते. कोजागिरी पौर्णिमेचे संदर्भ अनेक ग्रंथातून मिळतात. ब्रह्मपुराण, वामन पुराण, महर्षि वात्स्यायन यांनीही या पौर्णिमेस होणाऱ्या लोकोत्सवाला ‘कौमुदीजागर’ संबोधिले आहे. वामन पुराणांत या रात्रीस दीपोत्सवाचा उल्लेख मिळतो. कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे.

सांस्कृतिक महत्त्व

अमृत प्राप्तीसाठी देव-दानवांमध्ये स्पर्धा लागली होती आणि त्यातूनच सागर मंथन घडले. सागराच्या पोटातून अनेक उत्तमोत्तम रत्ने बाहेर पडली. लक्ष्मी सागरातून प्रकट झाली, तो दिवस म्हणजे आश्विन पौर्णिमा! श्रीमहालक्ष्मी मातेचा जन्मदिवस म्हणून ही पौर्णिमा प्रसिद्ध आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो. चंद्र यावेळी पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो. ऋग्वेदात म्हटले आहे, की ‘चंद्रमा मनसो जात:’ ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र मनावर थेट प्रभाव टाकतो. त्यामुळे या दिवसाचे मनोवैज्ञानिक महत्त्व देखील आहे. आयुर्वेदानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र प्रकाशात आटीव दुधात अनेक रोगांवरील औषधी वनस्पती मिसळून रामबाण औषधे निर्माण केली जातात. मानसिक आजारावर देखील आटीव दुधात चंद्र प्रकाशात मध्यरात्री औषध सिद्ध केले जाते.

दुधाचे महत्त्व

भगवान श्रीकृष्ण सोळा कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात व्रजभूमीत, अर्थात वृंदावनात भगवंताने महारासलीला-रासक्रीडा केली होती. याप्रसंगाचे स्मरण म्हणून वैष्णव भक्त रासोत्सव करतात. या पौर्णिमेला रात्री लक्ष्मीची, कुबेराची, व ऐरावतावर आरूढ इंद्राची पूजा करतात. दिवसभर उपवास, पूजन, जागरण असे तिन्ही गोष्टींचे महत्त्व आहे. या तिन्ही देवतांची रात्रीच्या पहिल्या प्रहरी पूजा करून, पोहे व नारळाचे पाणी नैवेद्य म्हणून अर्पण करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. उत्तररात्रीपर्यंत जागरण करून सकाळी स्नान करून या कोजागिरी व्रताचे पारणे करण्याची परंपरा आहे. आटीव दूध औषधी गुणांनी युक्त असल्याने या मुहूर्ताची आयुर्वेद तज्ज्ञ वर्षभर वाट पाहत असतात. या रात्री घरातील ज्येष्ठ अपत्याचे औक्षण करून आश्विनी साजरी करण्याची परंपरा आहे.

पावसाळा संपून सर्वत्र सुंदर हिरवेगार वातावरण असते. नवीन पीक आलेले असते म्हणून या पौर्णिमेला कोकणात ‘नवान्न पौर्णिमा’ असेही म्हणतात. धान्य लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घराला नवीन धान्याचे तोरण बांधतात. दाराबाहेर लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळ्या घालतात, दिवे लावतात. सर्वजण चंद्रप्रकाशात गाणी, भजने म्हणतात. भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व निश्चितच आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com