

Marathi Identity and the Role of Sahitya Sammelan
esakal
साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने मराठी समाज आणि मराठी साहित्य यांची स्थितिगती आणि भवितव्य याविषयी मंथन होणे ही स्वाभाविक असते. त्यामुळेच राजकीय-सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या, देदीप्यमान इतिहासाच्या खुणा मिरवणाऱ्या साताऱ्यात होणाऱ्या साहित्य संमेलनात विश्वास पाटील यांच्यासारखा दमदार साहित्यिक मराठी अस्मितेची तुतारी स्वप्राणाने फुंकून मराठी मनांमध्ये निर्माण झालेली मरगळ झटकून टाकेल, असा आशावाद अनेकांच्या मनात होता. तो कितपत फलद्रुप झाला, हा प्रश्न आहे.