

The Life and Legacy of Madhav Gadgil
Sakal
माधव गाडगीळ यांच्या निधनाने देशातील एक अभ्यासू आणि विवेकी स्वर लोपला आहे. जल, जंगल आणि जमिनी अशा सर्वच ठिकाणी विकासाच्या नावाखाली होत असलेल्या सुसाट अतिक्रमणांच्या विरोधात बोलणारा, त्यातले धोके दाखवून देणारा हा स्वर होता. त्यामागील त्यांची सारी तळमळ ‘पश्चिम घाटा’संबंधी त्यांनी तयार केलेल्या अहवालात प्रतिबिंबित झाली आहे. विचारवंत म्हटल्यानंतर जी प्रतिमा डोळ्यासमोर येते, त्यात गाडगीळ बसत नव्हते. पांडित्याला बऱ्याचदा रूक्षतेचा शाप असतो. पण गाडगीळ केवळ त्यापासून मुक्तच होते, असे नाही तर जगण्यातला आनंद कसा घ्यावा, याचे एक उदाहरणच बनले होते.