Mahabharata Life Lessons: मानवी जीवनाला व्यापणारे ‘महाभारत’

Mahabharata and Its Timeless Lessons About Human Life: महाभारत केवळ युद्धाची कथा नाही; मानवी जीवनाचे अनेक पैलू उलगडणारा महाग्रंथ
Mahabharata Life Lessons How the Ancient Indian Epic Reflects Human Emotions Relationships Conflicts and Everyday Life

Mahabharata Life Lessons How the Ancient Indian Epic Reflects Human Emotions Relationships Conflicts and Everyday Life

sakal

Updated on: 

डॉ. श्रीनंद बापट, निबंधक आणि अभिरक्षक, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर

महाभारताचे माहात्म्य हे त्यातील आशयाची भव्यता आणि संपूर्ण मानवी जीवनाला कवेत घेण्याची शक्ती यांत सामावलेले आहे. त्यातील विचार, मूल्ये यांचे महत्त्व आजही तितकेच प्रस्तुत आहे. जागतिक साहित्याच्या तुलनेत म्हणूनच त्याचे वैशिष्ट्य ठळकपणे उठून दिसते. ‘महाभारता’चे भूर्जपत्रावरील हस्तलिखित पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत जतन करण्यात आले आहे. ‘युनेस्को’ने ज्याची प्रामुख्याने दखल घेतली ते हे हस्तलिखित. जॉर्ज ब्युलर या विद्वानाने १८७५-७६ मध्ये मुंबईच्या प्रांतिक सरकारसाठी जी हस्तलिखिते काश्मीरमधून गोळा केली होती, त्यातील ही १५९ क्रमांकाची पोथी. तिच्यात ३३९ पाने आहेत. ही भूर्जपत्राची पोथी आहे आणि संस्कृतमध्ये व शारदा लिपीमध्ये लिहिलेली आहे.

Loading content, please wait...