

The Erosion of Autonomy: State Election Commission Under Fire
Sakal
राज्यात २९ महानगरपालिका निवडणुकीचा कौल आज स्पष्ट होईल. या निवडणुकांदरम्यान चर्चिल्या गेलेल्या घटनांमध्ये सत्ताधारी पक्षांनीच एकमेकांविरुद्ध केलेले बेछूट आरोप, ६९ जागांवरील बिनविरोध निवडणुका, पैशांचे खुलेआम वाटप आणि अर्थातच राज्य निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, या प्रमुख घटना ठरल्या. राज्य निवडणूक आयोगाने ‘स्वायत्त घटनात्मक संस्था’ म्हणून त्यांचा आब आणि धाक ठेवला आहे का, यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्य निवडणूक आयोग म्हणजे गेला बाजार सरकारी ‘महामंडळ’ नाही.