Maharashtra Municipal Elections 2025 Overview
sakal
पुरोगामी महाराष्ट्र... पक्षाशी एकनिष्ठ... गोरगरीब जनतेसाठी... विकासासाठी सत्ता... हे सगळे सध्या तरी ‘शब्द बापुडे केवळ वारा’या प्रकारातील वाटते आहे. तडजोडी, समीकरणे, सौदेबाजी यांच्या गदारोळात लोकाभिमुखता आणि राजकीय ध्येयवाद या गोष्टी जणू लोप पावल्या आहेत. ‘मला’ मिळालं तरच पक्षाशी निष्ठा, नाही तर पक्ष गेला उडत, अशी अनेकांची भूमिका असते, हे महापालिका निवडणुकांत स्पष्टच दिसत आहे. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.