ravindra chavansakal
editorial-articles
अग्रलेख : सूज की विस्तार?
सत्ताकारणातील तात्कालिक लाभ आणि खराखुरा पक्षविस्तार यात फरक असतो. प्रदेशाध्यक्षांना त्याची काळजी करावी लागणार आहे.
सत्ताकारणातील तात्कालिक लाभ आणि खराखुरा पक्षविस्तार यात फरक असतो. प्रदेशाध्यक्षांना त्याची काळजी करावी लागणार आहे.
प्रतिकूल परिस्थिती असताना महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला रुजवण्यासाठी ज्यांनी मोठा वाटा उचलला होता, अशा प्रमुख नेत्यांच्या ‘खुर्ची’त आता रवींद्र चव्हाण बसणार आहेत. यापूर्वी उत्तमराव पाटील, ना. स. फरांदे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांनी ही जबाबदारी सांभाळलेली आहे.