
अनुकरण ही गोष्ट सर्वथा त्याज्य नसते. पण ते जर डोळस नसेल, भल्याबुऱ्याचा, दूरगामी हित-अहिताचा विचार त्यात नसेल तर ते नक्कीच घातक ठरते.
लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. केवळ दोन जिवाचेच नाही तर दोन कुटुंबांचे होणारे मनोमिलन व्यक्तीच्या आयुष्यातील एक मंगलमय पर्व असते. भारतीय संस्कृतीने विवाहाला संस्काराचा दर्जा दिला आहे, याचे कारण व्यक्तीला जीवनामध्ये जे चार पुरुषार्थ साध्य करत मोक्षाप्रत जायचे असते, त्या प्रवासातील विवाह हादेखील एक महत्त्वाचा घटक असतो.