

local body election
esakal
छोट्या पालिकांमध्ये पाणीपुरवठा, कचरा निर्मूलन आणि वाहतुकीच्या समस्या या उग्र स्वरुप धारण करत आहेत. त्याचे निराकरण करणे हे नव्या लोकप्रतिनिधींसमोरचे मोठे आव्हान असेल.
‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा भाग असलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल अपेक्षेप्रमाणे वाजला. मागील अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ‘मतोत्सवा’ला अखेर मुहूर्त लाभला. अर्थात त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा महत्त्वाचा ठरला.