सौंदर्यस्पर्धेतील युवतीने आयोजकांच्या ‘हीन’ दृष्टिकोनाची चिरफाड करत स्पर्धेतून माघार घेतली, तेव्हा अस्वस्थ करणारे शेकडो प्रश्न उपस्थित झाले.
भारतीय नारी झोपडीतली असो वा राजवाड्यातली, तिचे भागधेय फार वेगळे नसते. आपल्या देशात, जिथे स्त्रीला माता, भगिनी, अगदी देवीसमान पुजण्याची भाषा केली जाते, तिथेच अक्षरश: शेकडो, हजारो घरांमध्ये हीच स्त्री उंबरठ्याच्या बाहेरही पडू शकत नाही. पडलीच, तर तिच्या वाटेवर काचा असतात.