Trump’s Exit from International Pacts
sakal
विसाव्या शतकात दोन महायुद्धांच्या भीषण अनुभवातून गेलेल्या युरोपाला शांतता आणि स्थैर्याचे महत्त्व किती वाटत असेल, हे वेगळे सांगायला नको. त्या दिशेने या खंडातील देशांनी गेल्या काही दशकांत पावले उचलली. ‘युरो’ हे एक चलन स्वीकारून ‘युरोपीय समुदाया’च्या छत्राखाली हे देश एकत्र आले. संरक्षणाच्या प्रश्नाबाबत त्यांनी मुख्य भिस्त ‘उत्तर अटलांटिक करार संघटना’ (नाटो) वर ठेवली. अमेरिकाच ‘नाटो’ची कर्ती-धर्ती असल्याने ही युद्धोत्तर काळातील घडी अनेक वर्षे अबाधित राहिली होती. परंतु आता सगळ्याच प्रकारच्या घड्या विसकटून टाकण्याचा पवित्रा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला असून ‘नाटो’च्या जबाबदाऱ्यांचे ओझेही उतरवून ठेवण्याची घाई त्यांना झाली आहे.